photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : मंदिरे बंदच, पुरोहित हतबल 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. त्याचप्रमाणे मंदिर आणि प्रार्थनास्थळेही बंद आहेत. त्यामुळेच शहरातील विविध मंदिरामध्ये पौरोहित्य करणाऱ्या पुरोहित व गुरुजींचीही उपासमार सुरु झाली आहे. आता मात्र मंदिरे उघडले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाउनमुळे सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद आल्याने मंदिरांवर अवलंबून असलेले पुरोहितांच्या पौरोहित्यावर गडांतर आले आहे.

चार हजार पुरोहित

शहरात जवळपास चार हजार पुरोहित आहेत. त्यातील तीनशे पुजारी हे मंदिरातील पूजा पाठ करतात, तर साडेतीन हजार पुजारी हे फक्त धार्मिक कार्यक्रमावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे जवळपास लहान मोठे ३०० मंदिरे आहेत. या मंदिरातील पुजारी हा पगारदार असतो. तेथील काही मोठे मंदिरातील ट्रस्टी हे पुजारींना अर्धा पगार देत आहेत. बाकीचे लहान मंदिरे बंदच आहेत. लोक घरात असल्याने घरातील पूजापाठ बंदच आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विविध पूजा बंद

सध्या विविध अभिषेक, व्रतवैकल्ये, रुद्राभिषेक, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहयज्ञ, विवाह, उपनयन, नवचंडी, श्राद्ध नवचंडी, शतचंडी प्राणप्रतिष्ठा, अभिषेक सत्यनारायण जप, गृहशांती, नक्षत्र शांती, कालसर्प योग, वर्षश्राद्ध, पिंडदान अशा विविध पूजा बंद झाल्या आहेत. 

पुरोहित म्हणतात... 

पुजेला परवानगीची गरज

युवराज राजेंद्र दिवेकर गुरुजी : कोरोनामुळे धार्मिक विधी, धार्मिक प्रार्थनास्थळे पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या खूप मोठ्या समाजाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पुरोहित त्याचप्रमाणे फुलहार, फळ, पान, पूजेची साहित्य केंद्र अजूनही बराच समाज हा धार्मिक कार्यावर अवलंबून आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


विधी सुरु होण्याची अपेक्षा 

श्रावण फडे : कोरोनात बंद असलेले सर्व व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. राज्य सरकारने या दिशेने वाटचाल केलेली असून लवकरात लवकर पौरोहित्य व्यवसाय करणाऱ्या पुरोहितांना मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे. सर्व धार्मिक विधी बंद असल्याने पुरोहितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून आता सर्व शांती कर्म, विवाहादी सर्व विधी सुरु होतील अशी अपेक्षा आहे.

शासनाने ही बंदी उठवावी

विश्वास नागापुरकर गुरुजी : दोन महिन्यापासून सर्व मंदिरे, धार्मिक कार्यक्रम हे बंद आहेत. त्यामुळे शहरातील पुरोहित वर्ग अडचणीत सापडला आहे. मंदिर बंद असल्याने पूजा पाठ तसेच मंदिराबाहेर बसणारे हार फुल विक्रेते, पूजासाहित्य विक्रेतेही अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने ही बंदी उठवून सर्व धार्मिक कार्यक्रमांना मान्यता द्यावी.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आर्थीक मदतीची अपेक्षा

भूषण चंद्रकांत कुलकर्णी : कोरोनामुळे सर्व धार्मिक विधी, मंदीरे बंद आहे. त्यामुळे पुरोहित वर्ग अडचणीत सापडला आहे. विवाह, मुंज, यज्ञयाग शांती या सर्व धार्मिक विधी बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे मंगल कार्यालय, आचारी, केटर्स, फुल विक्रेते, शेतकरी या सर्वांचेच व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे धार्मिक विधीला परवानगी द्यावी तसेच सरकारने आर्थिक मदत करावी.

कर्ज फेडण्याची विवंचना

संतोष पटवर्धन गुरुजी : कोरोना मुळे पुरोहित वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. मंदिरे बंद असल्याने पूजा बंद आहे. याशिवाय घरातीलही धार्मिक कार्यक्रम बंद आहे. अनेक गुरुजींनी विविध बँकेकडून कर्ज घेतलेली आहेत. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत पुरोहित अडकले आहेत. दोन महिन्यापासून पुरोहित घरीच असल्याने सरकारने मंदिरे खुले करण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT